झी युवा'वर अप्सरा सोनाली कुलकर्णी दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत!!!


दर्जेदार मालिकांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करणारी, 'झी युवा' ही मराठी वाहिनी, इतर अनेक खास कार्यक्रमांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांसाठी व चाहत्यांसाठी वेगळं आणि खास असं काहीतरी 'झी युवा' नेहमीच घेऊन येत असते.असाच एक नवा, कोराकरकरीत आणि अफलातून खजिना 'झी युवा' येत्या डिसेंबर महिन्यात घेऊन येत आहे. ११ डिसेंबर पासून 'युवा डान्सिंग क्वीन' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अनेक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सेलिब्रिटी चेहरे या स्पर्धेतील स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहेत. लोकसंगीत आणि मॉडर्न डान्सफॉर्म अशा दोन्ही प्रकारातील नृत्य स्पर्धक सादर करतील.युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठीची ही स्पर्धा फारच अटीतटीची होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांची लाडकी अप्सरा, सोनाली कुलकर्णी  परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. इंद्रपुरीतून उतरलेल्या या अप्सरेसमोर मंचावर या नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील.या शिवाय एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेता असलेला अष्टपैलू कलाकार, अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे आणि आणखी एका परीक्षकाची ओळख अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे . सेलेब्रिटी नर्तिका आणि त्याबरोवर असे मोठे चेहरे , ही मेजवानी प्रेक्षकांसाठी बहारदार ठरणार, हे निश्चित! याशिवाय,  या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. 'युवा डान्सिंग क्वीन' या पुढच्या महिन्यात भेटीला येणाऱ्या कार्यक्रमाविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहत रहा, 'झी युवा'!!


Post a Comment

0 Comments