Surr Sapatta - Marathi Movie

Surr Sapatta Upcoming Marathi Movie Based on Kabbaddiमातीशी घट्ट नाते असलेल्या कबड्डी खेळावर आधारित आगामी 'सुर सपाटा'या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त संपन्न झाला. चित्रपटाचे कथानक कबड्डी खेळावर अपार प्रेम असलेल्या लहान मुलांवर आधारित आहे. 
या चित्रपटाची निर्मिती आय स्पीड एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडया बॅनरने केलेली असून, मंगेश कंठाळे दिग्दर्शित या चित्रपटातून टॅलेनटेडमुले तसेच ज्येष्ठ कलाकार मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 
मराठी चित्रपटांनी नेहमीच उत्कृष्ट कथानकाच्या जोरावर पुढे येउन आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातूनच मराठी चित्रपट सृष्टी मोठी आणि प्रगतीशील झाली. चित्रपटाचे वेगळे विषय प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत असून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक लहान मुलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना दिसून येत आहेत.
जयंत लाडे प्रस्तुत सुर सपाटा हा कबड्डी खेळावर लक्ष केन्द्रीत करणारा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चित्रपटाचा लूक अत्यंत रोमांचक दिसत असून, मातीतल्या खेळाची ओढ वाढवणारा आहे. हा रोमांचक सिनेमा या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


No comments:

Theme images by nicodemos. Powered by Blogger.